loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळकरांची अंधारातून सुटका: महावितरणच्या 'योद्ध्यां'चे भर पावसात धाडस

दाभोळ (​सागर गोवळे) - काल गेल्या १२ तासांपासून दाभोळ परिसरातील वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिक हवालदिल झाले होते. मात्र, रात्रीच्या भयाण अंधारात आणि मुसळधार पावसात दाभोळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अदम्य जिद्दीमुळे अखेर दाभोळ उजळले आहे. ​दापोली व हर्णे भागातील वीजपुरवठा दुपारीच पूर्ववत झाला होता, पण दाभोळचा 'फॉल्ट' शोधणे मोठे आव्हान ठरले. अखेर वणौशी परिसरात बिघाडाचे ठिकाण सापडले. रात्रीचे १० वाजले होते, मुसळधार पाऊस कोसळत होता आणि वीजवाहिनी काटेरी जंगलात होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी साध्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​विशेष म्हणजे, खांबावर चढण्यासाठी आधार नसल्याने कर्मचाऱ्यांनी एकमेकांना खांद्यावर उभे करून (दहीहंडीच्या स्वरूपात) दुरुस्तीचे काम पूर्ण केले. या थरारक आणि कौतुकास्पद परिश्रमांमुळे रात्री ११ वाजता दाभोळचा वीजपुरवठा सुरळीत झाला. या कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg