loader
Breaking News
Breaking News
Foto

विजघर चेकपोस्ट येथे गोवा बनावटीची दारू वाहनांसह जप्त

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गोवा राज्यातून मोठया प्रमाणात गोवा बनावटीची दारू अवैधरित्या घाटमाथ्यावर कर्नाटक राज्यात नेली जाते, अशाप्रकारे गोवा बनावटीची दारू एका कारमधून कर्नाटक मध्ये नेली जात आहे. ही टीप विजघर चेकपोस्ट या ठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस सुरेश जाधव, तसेच इतर पोलिसांनी विजघर चेकपोस्ट या ठिकाणी प्रत्येक वाहन तपासणी करत असताना एका कारमध्ये गोवा बनावटीची विविध कंपन्या दारू आढळून आली. त्याची किंमत पन्नास हजारच्या आसपास तसेच वाहतूक करण्यासाठी वापर केलेली रिज कार असा एकूण ३ लाख ३८, १६० रुपये मुद्देमाल जप्त करून राजू प्रेमानाथासा बाळके, धारवाड हुबळी हेरोरी याला ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली, अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यानी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोवा राज्यातील गोवा बनावटीची दारू दोडामार्ग मधून पोलिसांच्या नजरा चुकवून घाटमाथ्यावर नेली जाते. उन्हाळ्यात अनेक चोरटयामार्गाचा वापर केला जातो. मंगळवारी रात्री विजघर चेकपोस्ट या ठिकाणी सुरेश जाधव तसेच सहकारी याना कारचा संशय आला म्हणून कार तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू सापडून आली. ही माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिली या नंतर पोलिसांच एक पथक विजघर चेकपोस्ट येथे येऊन संशयित आरोपी व कार दोडामार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या धडक कारवाईमुळे चोरटी दारू वाहतूक करणाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg