loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्यावतीने सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग सभासदांच्या मुलांसाठी तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक वाटप कार्यक्रम नुकता संस्थेच्या कार्यालय वरवेली येथे संपन्न झाला. हा उपक्रम गेली २५ वर्ष अविरतपणे सुरू आहे. संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमासाठी उद्योजक योगेंद्र विचारे (वरवेली), मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, मनसे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापिका सुजाता कांबळे, मोहन ढेरे, सर्पमित्र प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे रत्नागिरी, जय सर आदी मान्यवर तसेच संस्था कार्यकारी मंडळ सल्लागार व सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शैक्षणिक क्षेत्रातील गरज ओळखून समाजातील दानशूर व्यक्तीनीं शैक्षणिक साहित्य संस्थेला पुरवले. मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, शासकीय स्टॅम्प वेंडर हेमचंद्र मोरे, उद्योजक योगेंद्र विचारे (वरवेली), भाई बोरकर (दाभोळ मुंबई), पार्वती महादेव चौलकर प्रतिष्ठान रानगाव रायगड आदी दात्यानी शैक्षणिक साहित्य देवून सहकार्य केले, योगेंद्र विचारे यांनी मार्गदर्शन करताना या शैक्षणिक साहित्याचा उपयोग शालेय अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त झाला पाहिजे तसेच मोबाईलचा वापरही मुलांनी करू नये असेही मत मांडले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पाचवी ते बारावीपर्यंत वैयक्तिक शिष्यवृत्ती देण्याचे घोषित केले. तसेच इयत्ता दहावीमध्ये व बारावीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी ७५ टक्केपेक्षा जास्त गुण संपादन केले. तर त्या विद्यार्थ्यांना २१ हजार रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचे घोषित केले.

टाईम्स स्पेशल

उपस्थित सर्व मान्यवरांनी आपापल्या मनोगत व्यक्त करून संस्थेचे कार्याचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश अनगुडे यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन रुपेश संदेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत कदम, विनायक जाधव, सुनील मुकनाक, अनिल जोशी, प्रवीण मोहिते, श्रावण रावणंग, व्यवस्थापक निंबरे आदींनी विशेष प्रयत्न केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg