मुंबई: काही लोक म्हणाले लांडगेंचे ऑपरेशन करतो. पण तो तर कम्पाउंडर आहे. तो कसा ऑपरेशन करणार? इथे श्रीकांत शिंदे खरा डॉक्टर आहे. पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते. लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. ४ वर्षांपूर्वी याच लांडग्यांनी धमक्या दिल्या होत्या. मुंबईतून यावेच लागेल. वरळीतून जावेच लागेल. मुंबई कुणाची जहागीर आहे का? एकनाथ शिंदे एकटा आला. गाडीमध्ये बसला, बायरोड वरळीत येऊन थांबला. तेव्हा धमक्या देणारे घरात बसून ऑनलाईन बघत होते. तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. आता काय तर ऑपरेशन तुडवा. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे. ते 60 वर्धापन दिन मेळाव्यात बोलत होते.
कार्यकर्ता जपला पाहिजे, घडला पाहिजे, वाढला पाहिजे. तेव्हाच तो कार्यकर्ता तुडवण्याची भाषा करणाऱ्यांवर.... पुढचे जाऊ द्या. त्यामुळे हजारो लोक आपल्यासोबत येत आहेत. दररोज येत आहेत. वेटींग लिस्ट मोठी आहे. का येत आहेत? मी एकटाच निघालो होतो. लोक येत राहिले. कारवा बनता गया. राज्यसभेच्या निवडणुकीत अनेक जण रांगेत उभे होते. परंतु आपल्या शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला म्हणजेच ज्योतीताई वाघमारे यांना राज्यसभेचे तिकीट दिले. या माध्यमातून आपण शिवसेनेची भूमिका राज्याला दाखवून दिली. अगोदर संपत्ती बघून तिकीट दिले जायचे. मंचावरच्या अनेकांनी मला आपल्या मुलासाठी तिकीट मागितले. परंतु मी त्यांना सांगितलं की आपल्याला कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे.कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. त्यांनाही मोठं केलं पाहिजे. त्यानंतर या सर्वांनीच तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितले. असे सहकारी माझ्यासोबत आहेत. असे सहकारी सोबत असण्यासाठी नशीब लागते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. विधान परिषदेच्या १७ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उरलेल्या ११ जागा आपण जिंकल्या शिवाय राहणार नाही. विरोधकांचे खाते देखील उघडणार नाही. त्यांची पाटी कोरी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण बिनविरोध जिंकल्यावरही आपल्यावर आरोप केले. तुमचे उमेदवार टिकले नाही, पळून गेले. त्याला आम्ही काय करणार? हा महायुतीचा विजय आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, आपली महायुती मजबूत आहे. तिन्ही पक्षांचे बॉडिंग घट्ट आहे. देवेंद्रजी आणि माझ्यात काही लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आम्ही टीम म्हणून काम करतोय.
एकनाथ शिंदे म्हणाले, आपण चार वर्षांपूर्वी उठाव केला. आपला उठाव सुपरहिट झाला. महाराष्ट्रातील जनतेने तो स्वीकारला. मागे बाळासाहेब आणि दिघेसाहेबांचा आशीर्वाद तर होताच, म्हणून जनतेच्या न्यायालयात जिंकलो. लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भावांचे आशीर्वाद आपल्या पाठिशी होते. आपण उठाव केल्यानंतर ते लोक म्हणाले, कुणी सोबत राहणार नाही. कुणी निवडून येणार नाही. पण मी पहिल्या भाषणात म्हणालो होतो, एक जरी निवडून आला नाही, तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून गावाला शेती करायला निघून जाईल. ४० आमदार होते, एकनाथ शिंदेने ६० आमदार निवडून आणले. एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्याकडे आमदार आणि खासदार होतेच, त्यातच आता ६० नगराध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, सभापती, महापालिकांचे महापौर आहेत. सगळीकडे शिवसेनेचे वादळ घोंगावते आहे. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय. चांदा ते बांदा शिवसेनामय करून टाकण्याचे काम माझ्या शिवसैनिकांनी केले याचा मला अभिमान आहे.
.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.