खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरवर्षी जगबुडी नदीला पूर येऊन खेड शहरातील बाजारपेठ तसेच नदीकाठच्या अनेक गावांना फटका बसत असल्याने यंदाही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली खेड नगरपरिषदेच्या वतीने जगबुडी नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक आणि बचावकार्याची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली.
या सरावामध्ये खेड नगरपरिषदेचे कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, विसर्जन कट्टा टीम, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच अनुभवी पोहणाऱ्यांनी सहभाग घेतला. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करणे, बोटींच्या साहाय्याने बचावकार्य करणे, जीवनरक्षक साहित्याचा वापर, आपत्कालीन परिस्थितीत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे आणि मदतकार्य जलद गतीने राबविणे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. संभाव्य आपत्तीच्या वेळी कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी तसेच यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी हा सराव घेण्यात आला.
या प्रात्यक्षिकावेळी खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष तसेच नगरसेवक उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. जगबुडी नदीच्या वाढत्या पाणीपातळीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य पूरस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि बचाव पथके पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.