loader
Breaking News
Breaking News
Foto

महामार्ग ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एकाच ठिकाणी चार दिवसात दुसरा अपघात

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबई गोवा महामार्गावर असणार्‍या डायव्हर्शनला असणार्‍या खड्ड्यामुळे चारच दिवसांपूर्वी कोळशाच्या ट्रक पलटी होऊन अपघात झाला होता. त्यानंतरही कोणतीही सुधारणा झाली नव्हती. आज पुम्हा त्याच ठिकाणी बोलेरो पिकअप फसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. अनेकवेळा आवाज उठवूनही ठेकेदार दुर्लक्ष करत असून ठेकेदाराच्या मनमानिविरोधात येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई गोवा महामार्गाच्या काम करणार्‍या कंपनिच्या हलगर्जीपणामुळे अनेक अपघात होऊन अनेक नाहक बळी गेले आहेत. मात्र यावर आवाज उठवूनही कोणतीच सुधारणा होत नसल्याचे दिसून येते. याउलट कायद्याचा बडगा दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येते. महामार्गाचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे असून सुरक्षेच्या बाबतीतही हलगर्जीपणा केला जात असल्याचे बोलले जाते. तुरळ येथे एक डायव्हर्शनवर अनेकवेळा अपघात घडून आले आहेत.

टाईम्स स्पेशल

कोणतीही सुरक्षा उपाय न करता महामार्गाच्यामध्ये मोठे चर ठेवण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वी या चरामध्ये कोळशाच्या ट्रक पलटी होऊन अपघात झाला होता. यानंतर हे चर भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज त्याचठिकाणी पावसामुळे खड्ड्यात पाणी असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने एक बोलेरो पिकअप अडकून पलटी होता होता वाचली. असे वारंवार अपघात होत असतानाही महामार्ग ठेकेदारांची मनमानी सुरू असल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. येथील रिक्षा संघटना, व्यापारी संघटना तसेच विविध राजकीय पक्ष यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg