मंडणगड (प्रतिनिधी ) --: दरवर्षी २३ जून रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय विधवा दिन' साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवसाचे महत्त्व ओळखून, विधवा या शब्दाऐवजी 'एकल महिला' हा अधिक सन्मानजनक शब्द वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात या दिवशी एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी, रोजगाराच्या संधी आणि बचतगटांविषयी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजात पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना सोसाव्या लागणाऱ्या यातना, त्यांचा सामाजिक छळ आणि आर्थिक विवंचना यांबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती मंडणगड पंचायत समितीच्या सभापती सौ प्रणाली चिले यांनी मंडणगड येथील एकल महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना दिली.
यावेळी उपसभापती श्री. दिपक मालुसरे , पंचायत समिती सदस्य श्री. अनिल रटाटे , पंचायत समिती सदस्या सौ. दीप्ती घडशी , मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री . राजेंद्र आंधळे , बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. सुनिल खरात , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे , आरोग्य पर्यवेक्षक तातू पारधी , मंडळ पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी वामन मेंढे , आयसीडीएस विभागाच्या पर्यवेक्षिका सुनंदा पोंदे , स्वाती ठाकरे , शांताराम पवार , अंगणवाडी सेविका , बचत गटाच्या महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेला 23 जून या आंतरराष्ट्रीय विधवा दिन पंचायत समिती मंडणगड येथे एकल महिला दिवस आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित राहिल्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला उपस्थित सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये एकल महिलांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता निर्माण करणे आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे .












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.