loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णेमध्ये भाजपाचा मोफत पाणी पुरवठा; पाणी पुरवठ्याच्या सामाजिक कामाने हर्णेवासीय सुखावले

दापोली (प्रतिनिधी) : हर्णे येथे पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून भारतीय जनता पार्टी दापोलीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुका अध्यक्षा जया साळवी, तालूका सरचिटणीस संदीप केळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविंद्र मेंहदळे, अजय साळवी, विवेक भावे आदिंसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हर्णे आणि पाजपंढरी येथील प्रमुख पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी दापोली तालुक्यातील हर्णे येथील रहिवाशांना मोफत पाणी वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम सुरू केला आहे. या त्यांच्या सामाजिक कामाने हर्णेवासीय चांगलेच सुखावले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील हर्णे गाव हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. अशा या गावात पाणी टंचाईची समस्या खुपच मोठी आहे. येथे दर पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. गावातील तळे, विहिरी, बोरवेल चे पाण्याचे स्रोत आटले आहेत त्यातच केला जाणारा पाणी पुरवठा मर्यादित केला जात असल्यामुळे येथील रहीवाशांना तीव्र पाणी टंचाईचा सामना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हर्णे येथील रहिवाशांना पाणी पाणी करावे लागत आहे. अशा या पाणी टंचाईच्या जाणवणाऱ्या बिकट संकटात भाजपा पुढे सरसावली असून भाजपाकडून सर्वांना मुबलक आणि मोफत पाणी पुरवठा सुरू केल्याने येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे भाजपाच्या या सामाजिक कामाचे हर्णे गावासह तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg