loader
Breaking News
Breaking News
Foto

गोवंश मांस सापडल्याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करावी , पालकमंत्री सामंत यांच्या पोलीस अधीक्षकांना सूचना

रत्नागिरी: तालुक्यातील फणसवळे ते करबुडे दरम्यान गोमांस सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पोलीस प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नामदार उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, या संवेदनशील घटनेची पोलिसांनी कसून चौकशी करणे आवश्यक आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी तातडीने ४ जणांची विशेष टीम तयार केली आहे. ही टीम घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडू दिला जाणार नाही, तसेच दोषींची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही सामंत यांनी दिली आहे. या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg