loader
Breaking News
Breaking News
Foto

'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०' च्या सिंधुरत्न कार्यकारी समितीवर विनय नातू आणि दीपक केसरकर यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती

मुंबई : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून या जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने या दोन जिल्ह्यांसाठी 'सिंधुरत्न समृध्द योजना २.०' ही योजना सन २०२६-२७ ते २०२८-२९ या ३ वर्षासाठी राबविण्यास संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. संदर्भाकीत शासन निर्णयातील परिच्छेद ५ मध्ये 'सिंधुरत्न समृध्द योजना २. ०' करिता 'सिंधुरत्न समृध्द योजना २.०' भाग-२ अंतर्गत स्वतंत्र आराखडा तयार करणे व त्याची कालबध्द अंमलबजावणी करण्याकरिता सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्याकरिता दोन स्वतंत्र "सिंधुरत्न कार्यकारी समिती" गठित करण्यात आल्या आहेत. सदर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्याकरिता गठित केलेल्या दोन स्वतंत्र “सिंधुरत्न कार्यकारी समिती" च्या संरचनेमध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती 'उपाध्यक्ष' असेल अशी तरतूद आहे. सदर तदतूदीच्या अनुषंगाने 'सिंधुरत्न समृध्द योजना २.०' अंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांकरिता दोन स्वतंत्र गठित करण्यात आलेल्या 'सिंधुरत्न कार्यकारी समिती' वर दोन उपाध्यक्ष यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०' राबविण्यासंदर्भातील संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ५ मधील तरतूदीनुसार 'सिंधुरत्न कार्यकारी समिती', सिंधुदुर्ग व 'सिंधुरत्न कार्यकारी समिती' रत्नागिरी वर खालीलप्रमाणे 'उपाध्यक्ष' यांची नियुक्ती करण्यात येत आहे. १. श्री. दीपक केसरकर, उपाध्यक्ष, सिंधुरत्न कार्यकारी समिती, सिंधुदुर्ग २. डॉ. विनय नातू, उपाध्यक्ष, सिंधुरत्न कार्यकारी समिती, रत्नागिरी

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg