सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे चेरापुंजी आणि प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली येथील मुख्य धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले बांबूचे कुंपण म्हणजे सिंधुदुर्ग पर्यटन विभागाचा निष्काळजीपणा असून, हे पर्यटन विभागाची लक्तरे वेशीवर टांगण्यासारखे आहे, अशी घणाघाती टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून, यासारखा दुसरा मोठा विनोद नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे वरदान लाभलेल्या आंबोलीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. येथील मुख्य धबधब्याचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळ म्हणून आंबोली पर्यटकांच्या स्वागतासाठी सर्व सोयी-सुविधांसह सज्ज होणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्य धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षेच्या नावाखाली केवळ बांबूचे एक कच्चे कुंपण उभारण्यात आले आहे. हे वरवरचे सुरक्षा कवच पर्यटकांच्या जिवाशी खेळणारे ठरू शकते. बबन साळगावकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, "आंबोलीचा मुख्य वॉटर फॉल हा पर्यटनाचा मुख्य हॉटस्पॉट आहे. मात्र, सध्या या पर्यटन क्षेत्राची मोठी दुरवस्था झाली असून, इथला संपूर्ण परिसर अत्यंत गलिच्छ झाला आहे. प्रशासनाकडून पर्यटनाच्या नावावर लाखो-करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो.
पर्यटन स्थळे सज्ज झाल्याचे दावे केले जातात; परंतु आंबोलीमधील हे निराशाजनक चित्र पाहिल्यानंतर प्रशासनाचे हे दावे म्हणजे केवळ 'बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात' वाटायला लागली आहे." पावसाळ्यात पर्यटकांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे सिंधुदुर्ग वनविभाग आणि सिंधुदुर्ग पर्यटन विभागाने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालणे गरजेचे आहे. येथील अस्वच्छता दूर करून पर्यटकांना भक्कम आणि सुरक्षित कवच उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून सिंधुदुर्ग पर्यटनाची अशी नाचक्की वेशीला टांगल्यासारखी दिसणार नाही, अशी मागणीही साळगावकर यांनी केली आहे.















.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.