loader
Breaking News
Breaking News
Foto

​भाजी मार्केट व पार्किंग सुविधेमुळे सावंतवाडीचा चेहरामोहरा बदलणार; शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध: आमदार दीपक केसरकर

​सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान असलेले आमदार दीपक केसरकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आणि सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ​या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखमराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मुख्याधिकारी विनायक औंधकर, सभापती आनंद नेवगी, सुधीर आरीवडेकर, प्रतीक बांदेकर, दिपाली भालेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​कार्यक्रमात बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, ​"शहरात आधुनिक सुविधांनी युक्त अशा भाजी मार्केटची उत्कृष्ट इमारत उभारली जात आहे. यामुळे आणि नवीन पार्किंग व्यवस्थेमुळे शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. शहराच्या या विकासकामांसाठी पालकमंत्री नितेश राणे भरघोस निधी उपलब्ध करून देत आहेत, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो." ​नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी आपल्या मनोगतात आजचा दिवस सावंतवाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. शहरात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देताना त्या म्हणाल्या की, आज सफाई कर्मचाऱ्यांना हक्काची नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. तसेच, नागरिकांच्या आरोग्यासाठी 'नरेंद्र डोंगर' येथे आधुनिक योगा आणि मेडिटेशन सेंटर उभारले जात आहे.

टाईम्स स्पेशल

​पालकमंत्री नितेश राणे यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg