loader
Breaking News
Breaking News
Foto

एस. टी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा

रत्नागिरी (जमीर खलफे) - रत्नागिरी तालुक्यातील विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, रत्नागिरी आगार व टीआरपी येथून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा तालुकास्तरीय स्नेह मेळावा रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता दत्त मंगल कार्यालय, राधाकृष्ण टॉकीज शेजारी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर मेळाव्यामध्ये माहे जून 2026 मध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत. अशा सुमारे 44 सभासदांचे वाढदिवस सन्मानाने साजरे करण्यात येणार आहेत. तसेच निवृत्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी इतर क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशा सभासदांचेही सत्कार करण्यात येणार आहेत. तसेच मेळाव्याचे ठिकाणी भोजनाची व्यवस्था देखील केलेली आहे. तरी कृपया रत्नागिरी युनिट मधील रा. प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या सभासदांनी मोठ्या संख्येने सदर मेळाव्यास उपस्थित राहावे, अशी आयोजकांतर्फे विनंती आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg