loader
Breaking News
Breaking News
Foto

तळे हायस्कूलमध्ये सामाजिक न्याय दिन व अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

खेड - खेड तालुक्यातील तळे विभाग सेकंडरी स्कूल तळे विद्यालयामध्ये आरक्षणाचे जनक, बहुजन उद्धारक, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे थोर समाज सुधारक, राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिन तसेच अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. प्रथम सर्व उपस्थितांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक प्रवीण खरात यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रस्तावना केली. यानंतर विद्यार्थ्यांनी थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या महानकार्याबद्दल मनोगते व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर विद्यालयाचे शिक्षक प्रशांत पंदेरे यांनी याच दिवशी अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने अंमली पदार्थांचा मानवी जीवनात होणारा विपरीत परिणाम, आरोग्यावरती होणारे दुष्परिणाम, व्यसनाचे दुष्परिणाम सर्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन करून रॅलीचे आवाहन केले व सर्वांचे आभार व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg