loader
Breaking News
Breaking News
Foto

धोपावे येथे सलग तिसऱ्या वर्षी मोफत नेत्र तपासणी शिबिर; १९ रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - ग्रामपंचायत धोपावे यांच्या पुढाकारातून आणि समता फाउंडेशन, भ. क. ल. वालावलकर रुग्णालय, डेरवण (चिपळूण), प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली व उपकेंद्र धोपावे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत धोपावे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले हे आरोग्य शिबिर सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीपणे पार पडले. या शिबिराला परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच नेत्रविकारांबाबत योग्य सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. तपासणीदरम्यान मोतीबिंदूचा त्रास असलेल्या रुग्णांची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानुसार, एकूण १९ रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया भ. क. ल. वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. रुग्णांच्या ने-आण व्यवस्थेसह रुग्णालयातील राहण्याची, जेवणाची तसेच शस्त्रक्रियेनंतर आवश्यक असणाऱ्या काळ्या चष्म्याची सुविधाही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना पुन्हा स्पष्ट दृष्टी लाभण्यास मदत झाली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांनाही दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल आयोजक संस्थांचे मनापासून आभार व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

ग्रामपंचायत धोपावेच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी अशा प्रकारचे आरोग्य शिबिर यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, भविष्यातही अशा लोकोपयोगी आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत धोपावे, समता फाउंडेशन, भ. क. ल. वालावलकर रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली व उपकेंद्र धोपावे यांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg