loader
Breaking News
Breaking News
Foto

इस्कॉन सावंतवाडी आणि योगा फाउंडेशनच्या वतीने भटवाडी येथे जागतिक योग दिन साजरा

सावंतवाडी: इस्कॉन सावंतवाडी आणि योगा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भटवाडी येथील इस्कॉन सेंटरमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला इस्कॉन सावंतवाडीचे साधक आणि बालसंस्कार वर्गातील मुलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ​याप्रसंगी इस्कॉन सावंतवाडीचे वसुश्रेष्ठ दास, उद्धव प्रिय प्रभुजी, देवकी पुत्र प्रभुजी, राजा वाडकर प्रभुजी यांच्यासह अनेक वरिष्ठ भक्त आणि माताजी उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात योगा फाउंडेशनच्या योगशिक्षिका डॉक्टर रेवती लेले यांनी उपस्थित भक्तांकडून प्राणायामाची प्रात्यक्षिके करून घेतली. यामध्ये कपाळभाती, अनुलोम-विलोम, ओमकार आणि विविध मुद्रांची माहिती देऊन ही आसने कशी करावीत, याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. ​त्यानंतर, इस्कॉन सावंतवाडी सेंटरचे राधा शरण प्रभुजी यांनी भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायावर आधारित विशेष व्याख्यान दिले. मन, बुद्धी आणि आत्मा नियंत्रित करून कशा प्रकारे कार्य करावे, याविषयी त्यांनी उपस्थितांना अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाचा लाभ ८० पेक्षा जास्त भक्तांनी घेतला. शेवटी सुंदर कांती माताजींनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इस्कॉनच्या सर्व भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg