loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटीचा 'डिजिटल प्रवास': १ ऑगस्टपासून महिला आणि ज्येष्ठांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य

मुंबई (सागर गोवळे) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) प्रवासात आता पूर्णपणे डिजिटल युगाची पहाट होणार आहे. एसटी प्रवाशांसाठी अधिक पारदर्शकता आणि सुलभता आणण्याच्या उद्देशाने, १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ’अमृत ज्येष्ठ नागरिक’ यांच्यासाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१ ऑगस्ट २०२६ पासून नियम लागू. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक. राज्यात ५१ लाखांहून अधिक नोंदणी पूर्ण झाली आहे. तर २५ लाख कार्डे कार्यान्वित आहेत. राज्यभरात ४ हजारांहून अधिक वितरण केंद्रे कार्यरत आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, कार्ड वितरणात गैरव्यवहार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. विहित शुल्कापेक्षा जास्त पैसे उकळणार्‍या केंद्रांचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल. ज्या लाभार्थ्यांनी अजूनही स्मार्ट कार्ड मिळवलेले नाही, त्यांनी कोणताही विलंब न करता नजीकच्या वितरण केंद्रावर जाऊन आपली प्रक्रिया पूर्ण करावी. डिजिटल परिवर्तनाच्या या प्रवासात सहभागी होऊन आपला प्रवास अधिक सुखकर करा! तुमचा प्रवास आता अधिक स्मार्ट आणि डिजिटल!

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg