loader
Breaking News
Breaking News
Foto

युएई आणि भारत यांच्यात ब्रम्होस क्षेपणास्त्र व्यापार होणार असल्याच्या चर्चेने खाडी देशात मोठी खळबळ

नवी दिल्ली - भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात ब्रम्होस क्षेपणास्त्र व्यहार होणार असल्याच्या वृत्ताने खाडी देशात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सौदी अरब देशाने यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रॉयटरच्या रिपोर्टनुसार भारत आणि युएई दरम्यान ब्रम्होस क्षेपणास्त्र व्यापार बाबत संवाद सुरु आहे. त्यानंर सौदी अरब आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तानने ब्रम्होस क्षेपणास्त्राची क्षमता समजून घेतली आहे कारण गेल्यावर्षी भारतानाने ११ पाकिस्तानी ठिकाणांवर ब्रम्होसने हल्ला करुन परिसर उध्वस्त केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारत आणि युएईमध्ये अशावेळी ब्रम्होस क्षेपणास्त्र सौदा होत आहे, जेव्हा गेल्यावेळी सौदी अरबने पाकिस्तानसोबत नाटोसारखा संरक्षण समझोता केला आहे. त्यामध्ये एका देशावर हल्ला झाला तर दोन्ही देशावर हल्ला मानला जाईल. यानंतर युएईने भारतासोबत रणनिती सामुग्री बाबत जलद प्रयत्न सुरु केले आहेत. भारताकडे युएईने क्षेपणास्त्राची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या चिनी एअर डिफेन्स सिस्टीमला शोधून ब्रम्होसने अनेक ठिकाणे उध्वस्त केली. त्यामुळे भारताकडे असणारे ब्रम्होस क्षेपणास्त्र जगभरात प्रसिद्ध झाले आहे. त्याचीच मागणी आता भारताकडे युएई करीत आहे. त्यामुळे खाडी अरब देशात मोठी खळबळ उडाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg