loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, खेड येथे आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देण्याचा स्तुत्य उपक्रम संघटनेने राबविला. संघटनेचे अध्यक्ष रविउदय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, दहावी व बारावी परीक्षा तसेच बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आणि विविध पदवी-पदविका अभ्यासक्रमांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक निवृत्त केंद्रप्रमुख दिलीप सावंत यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर यशाची शिखरे गाठता येतात, असा मौल्यवान संदेश दिला. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. सी. आर. कांबळे हे पाटबंधारे विभागातून तसेच पंचायत समितीचे वरिष्ठ लिपिक प्रताप गमरे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संघटनेच्या वतीने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ, मुंबई मंडळाचे अध्यक्ष ॲड. दिपक हळदे, ग्रामीण तालुका अध्यक्ष मंदार हळदे यांच्यासह सरचिटणीस ॲड. संतोष सावंत, खजिनदार सुनील तांबे, नागेश सकपाळ, मनोज मोरे, ॲड. सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्या अपूर्वा जाधव, माजी सदस्य डॉ. गणेश मोरे, युवा मंच अध्यक्ष अनिल पवार, महिला आघाडीच्या तालुका सरचिटणीस अपूर्वा पवार, शांतीदूत प्रतिष्ठानच्या संस्थापक रिना तांबे, सखाराम मोहिते, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सी. आर. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन निलेश तांबे व दिपक कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव विनोद कांबळे यांनी मानले. या यशस्वी सोहळ्यासाठी भागुराम तांबे, चंद्रकांत कांबळे, सुरेश तांबे, जयंत तांबे, अशोक धोत्रे, दिनेश महाडिक, निकेत गमरे तसेच संघटनेच्या सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg