loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठी बातमी! केंद्रीय राज्यमंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; राजीनामा तत्काळ प्रभावाने मंजूर

तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिला राजीनामा केंद्रीय अल्पसंख्याक आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार त्यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला. त्यांचा राज्यसभा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी हे पद सोडले आहे.तसेच, संपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने जून २०२४ मध्ये नव्या कार्यकाळाची सुरुवात करताना राष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवला होता. (ही सरकार स्थापनेच्या प्रक्रियेतील एक नियमित घटना असते.]

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती भवनाने मंगळवारी सकाळी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कमल ७६(२) अंतर्गत मंत्र्याचा राजीनामा मंजूर केला आहे. २०२४ मध्ये भाजपच्या ख्रिश्चन समुदायापर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

टाइम्स स्पेशल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ऑगस्ट २०२४ मध्ये जॉर्ज कुरियन यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालय यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ संपला होता. भाजपने त्यांना पुन्हा न निवडण्याचा निर्णय घेतला आहे. ६५ वर्षीय जॉर्ज कुरियन हे ऑगस्ट २०२४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. ते भाजपचे एक प्रमुख नेते असून १९८० मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सदस्य आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg