loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीत फार्मर आयडी मंजुरीसाठी शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांचे फार्मर आयडी मंजुरीसाठी प्रलंबित असल्याने शेतकरी शासनाच्या विविध कृषी योजना, कर्जमाफी व शेतीविषयक अनुदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदार वैभववाडी यांना निवेदन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी तहसीलदार यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना फार्मर आयडी मंजुरीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. तसेच ज्या शेतकर्‍यांसाठी फार्मर आयडी हे कर्जमाफी, पीकविमा, कृषी अनुदान अथवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, अशा शेतकर्‍यांनी तात्काळ तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.

टाईम्स स्पेशल

अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करून घ्याव्यात, जेणेकरून मंजुरी प्रक्रियेत अडथळा येणार नाही, असे आवाहनही तहसीलदारांनी केले. शेतकर्‍यांच्या हिताच्या या महत्त्वपूर्ण विषयाकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्याबद्दल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. यावेळी शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख नंदु शिंदे, तालुका सचिव गुलजार काझी, महिला तालुका संघटक दिव्या पाचकुडे, विभागप्रमुख सुर्यकांत परब, स्वप्नील रावराणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg