रत्नागिरी (रिपोर्ट -सागर गोवळे) : जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ९० किलोमीटरच्या 'कॉम्रेड मॅरेथॉन'मध्ये रत्नागिरीच्या अभिजित पड्याळ यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कोकणचा झेंडा फडकवत, अभिजित यांनी ९ तास ५१ मिनिटांच्या वेळेत ही खडतर शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली. दक्षिण आफ्रिकेतील दर्बान ते पीटरमॅरिट्झबर्ग या मार्गावर यंदाची ही 'अप रन' मॅरेथॉन पार पडली. सततची चढण आणि शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारा हा मार्ग धावपटूंसाठी 'अग्निपरीक्षा' मानला जातो. जागतिक स्तरावरील धावपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणे, हे अभिजित यांच्या जिद्दीचे आणि कठोर परिश्रमांचे फळ आहे.
केवळ जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सराव या जोरावर अभिजित यांनी ही ९० किमीची मॅरेथॉन पूर्ण करत फिनिश लाइन गाठली. त्यांच्या या कामगिरीमुळे जगभरातील धावपटूंमध्ये रत्नागिरीच्या सुपुत्राची दखल घेतली गेली आहे. अभिजित यांनी ही कामगिरी फत्ते केल्याची माहिती मिळताच रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक क्रीडा संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे अनेक नवोदित धावपटूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.


























































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.