loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, भारती तायशेटये आदि शिक्षकवृंद यांनी नियमित योगासने आणि प्राणायाम केल्याने शरीर निरोगी तंदुरुस्त राहते मन प्रसन्न राहर्तेें असे सांगितले. योगासने आणि प्राणायाम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत खूप महत्त्वाचे आहे. योगासने प्राणायाम केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात यश लाभते विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते, त्यामुळे सर्वांनीच योगासने आणि प्राणायाम करणे आजच्या काळाची गरज आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंतरराष्ट्रीय योगा दिना विषयी सर्व शिक्षक वृंदांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून कथन केले. निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी दररोज सर्वांनी योगाभ्यास केला पाहिजे, असा संकल्प मेर्वी शाळेत आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगाचे प्रकार प्रात्यक्षिके सादरीकरण करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg