केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर)- राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला मोहरम ताजिया मिरवणूक लांजात शुक्रवार दिनांक २६ जून रोजी धार्मिक पद्धतिने अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. मुस्लिम बांधवांच्या पवित्र मोहरम उत्सवानिमित्त शरातून ढोल-ताशांच्या गजरात ताजियाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा लाभलेल्या या मिरवणूकीत दरवर्षी प्रमाणे शहरातील हिंदू बांधव ही सहभागी झाले होते. मागील दहा दिवसांपासून सुरु असलेल्या या उत्सवात अंतिम टप्प्यातील मिरवणूकीत शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
या मिरवणूकीचा शहरातील हजरत सय्यद चाँदशहा बुखारी दर्गाह मधून दुपारी चार वाजता प्रारंभ झाला. बाजारपेठेतील जूना बस स्टॉप, हनुमान मंदिर, जूनी बाजारपेठ वसाहत, पौलसतेश्वर मंदिर येथील तळया जवळून चव्हाटा मंदिर, जामा मशीद या मार्गावरुन मिरवणूक निघाली. दोन दिवस मुसळधार पडणार्या पावसाने दुपारनंतर उसंत घेतल्याने ताजिया मिरवणूकीस रंगत आली होती.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.