loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका मनीषा सावंत व पर्यवेक्षिका गायत्री कनगुटकर यांचा सन्मान

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरच्या कार्यतत्पर शिक्षिका मनीषा सावंत यांची उपमुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल व प्रशालेच्या गायत्री कनगुटकर यांची पर्यवेक्षक पदावर निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मनीषा सावंत व गायत्री कनगुटकर या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये कार्य तत्परतेने व कर्तव्यदक्षपणे नियमितपणे अध्यापन कार्य करीत असून त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत. सदर कार्यक्रमप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे उपस्थित होत्या.

टाईम्स स्पेशल

त्यावेळी बोलताना महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील म्हणाले की प्रशालेच्या उपमुख्याध्यापकपदी मनीषा सावंत यांची निवड झाल्याबद्दल व प्रशालेच्या पर्यवेक्षिकापदी गायत्री कनगुटकर यांची निवड झाल्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या यापुढील शैक्षणिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg