loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखजवळच्या मोगरवणे गावात दोन कुटुंबाच्या घरात तब्बल २५ वर्षानंतर वीज पोहोचली

देवळे (प्रकाश चाळके) - दिवे लागले रे दिवे लागले..... तमाच्या तळाशी दिवे लागले.... सुप्रसिद्ध कवी शंकर रामाणी यांच्या अर्थपूर्ण कवितेतील या ओळी. रामाणी यांनी ही कविता एका वेगळ्या प्रसंगी लिहिल्याचे सांगितलंय... परंतु या ओळीचा ढोबळ अर्थ पहिला तर तमाच्या तळाशी दिवे लागले... म्हणजेचे अंधाराचा तळ प्रकाशाने उजळून निघाला... देवरुख जवळच्या मोगरवणे गावातील दोन कुटुंबाच्या घरात गेली अनेक वर्ष अंधारच होता. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष होऊन गेली. देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली. परंतु देवरुख शहरापासून केवळ ८/९ किमी वर असणार्‍या या गावात चव्हाण आणि आयरे कुटुंबाच्या घरापर्यंत वीज पोहोचली नव्हती. जन सामान्यांचे कोणतेही काम करायच असेल तर त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवरुख चे माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी चव्हाण आणि आयरे कुटुंबाच्या घरात वीज पोहोचवण्याचा संकल्प केला. दोन वर्षाच्या अथक पाठपुराव्यानंतर त्यांना अखेर काल (१६ जून) या कामात यश आले. या कालच्या दिवशी गावातील चव्हाण आणि आयरे कुटुंबाच्या घरात वीज पोचली. याबद्दल अभी शेट्ये यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले कीं भारतीय जनता पार्टी ज्या ध्येयधोरणावर चालते त्यातील एकर महत्वाचे अंत्योदय विकास! समाजातील अंतिम अर्थात समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे हे भारतीय जनता पार्टी चे उद्दिष्ट आहे. मला आनंद आहे पार्टीच्या या शिकवणुकीनुसार मी कार्य करत आहे. देवरुखसारख्या तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरात देखील असे एखादे घर असेल जे २५ वर्षापासून लाईटपासून वंचित आहे. हे कुणाला खरे वाटणार नाही परंतु देवरुख बाजारपेठ पासून सुमारे ७ ते ८ कि.मी.दूर असलेल्या मोगरवणे वाडीत राहणारे महेश चव्हाण आणि महेश आयरे यांचे घर बांधून २५ वर्षे झाली तरी लाईट नव्हती.

टाईम्स स्पेशल

वाडीपासून दूर असलेल्या त्याच्या घरापर्यंत लाइट पोहचवणे खुपच खर्चिक असल्याने महावितरण विभागाला देखील शक्य होत नव्हते. गेली अनेक वर्ष चव्हाण आणि आयरे कुटुंबीय त्यासाठी प्रयत्न करत होते. दोन वर्षा पूर्वी ही बाब अभी शेट्ये यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी चव्हाण आणि आयरे यांच्या घरी लाईट पोहचवण्याचा निश्चय केला. दोन वर्षाच्या सातत्य पूर्ण प्रयत्नांना अखेर आज यश आले आणि या देवरुख मोगरवणे वाडीतील आयरे आणि चव्हाण यांच्या घरी आज वीज पोहचली. आयरे आणि चव्हाण कुटुंबियांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून खूप समाधान मिळाले. राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या बदलत चालला आहे. अशा या परिस्थितीत तळागाळातील माणसापर्यंत विकास पोचवाण्याचा ध्यास घेतलेली अभी शेट्ये यांच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळे देवरुखचे भविष्य उज्वल आहे याची खात्री वाटते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg