नवी दिल्ली ; राजधानी दिल्लीत शिवसेना (यूबीटी) संसदीय पक्षाची बैठक सुरू झाली. केवळ तीन लोकसभा खासदार, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे, उपस्थित झाले. पक्षाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना गुरुवारी सकाळी ११ वाजता दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देणारा व्हीप जारी केला होता. बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत यूबीटीचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, आमच्या खासदारांचे अपहरण झाले आहे. जे बैठकीला येतात ते आमच्यासोबत आहेत, जे येत नाहीत ते गद्दार आहेत. दरम्यान, शिवसेनेचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी गुरुवारी दावा केला की, यूबीटीचे सहा खासदार शिवसेनेत सामील झाले आहेत. ते म्हणाले की, 'ऑपरेशन टायगर' पूर्ण झाले आहे.
वास्तविक पाहता, UBT च्या नऊ खासदारांपैकी सहा जणांनी बंड केले आहे. सूत्रांनुसार, या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी ९:३० वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, अध्यक्ष किंवा बंडखोर गटाकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, "पक्षाचा आदेश सर्व खासदारांना मिळाला होता. तरीही काही सदस्य बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. आम्हाला वाटतं हा पक्षद्रोह आहे." त्यांनी सांगितले की, अनुपस्थित राहिलेल्या सर्व खासदारांना आजच कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. "संध्याकाळपर्यंत प्रत्येकाला नोटीस मिळेल आणि सात दिवसांच्या आत त्यांना उत्तर द्यावं लागेल."
या खासदारांवर पुढे काय कारवाई होणार, याबाबत विचारले असता सावंत म्हणाले, "कायदा त्यांच्यावर जी कारवाई करेल ती होईल. आम्ही लोकसभा अध्यक्षांनाही याबाबत पत्र लिहिणार आहोत." यामुळे ठाकरे गट आता केवळ पक्षांतर्गत कारवाईवर न थांबता संसदीय आणि कायदेशीर लढाईही लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.













































































































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.