loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळी महासंघातर्फे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांसाठी निवेदन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर कोळी या समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळण्याकरिता तसेच रक्त नात्यातील नातेवाईकांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली होती. सदरच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्री खासदार, आमदार, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, विभागाचे सेक्रेटरी, प्रशासनाचे अधिकारी व आदिवासी कोळी समाजाचे शिष्टमंडळ/ प्रतिनिधी यांचा समावेश होता. बैठकीदरम्यान आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तसेच विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या अन्नत्याग उपोषणामध्ये, आंदोलनमध्ये होत असलेल्या जातीच्या दाखल्याची व जात प्रमाणपत्राची प्रामुख्याने चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, सदर बैठकीस जवळपास दोन वर्षाचा कालावधी उलटून जाऊन सुद्धा सदरच्या बैठकीचे/ इतिवृत्तच अंमलबजावणी करण्यास सरकारकडून दिरंगाई होत असल्याने कोळी समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विषयासाठी सातत्याने पाठपुरवठा करण्यात येत असून दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीच्या निर्णयाची/इतिवृत्ताची तात्काळ अंमलबजावणी व्हावी व शासनाने आवश्यक ते परिपत्रक काढावे याकरिताआज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच वेळीस सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरता कोळी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना कोळी समाजाचे निवेदन आपल्या माध्यमातून सादर करावे, अशी विनंती यावेळेस करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

जर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये कोळी समाजाचा प्रश्न मार्गी न लावल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघ तीव्र आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड.चेतन पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अनिल राणे, वाल्मीक कुबल, विनायक पाटकर, कैलास कडू, श्यामसुंदर रेवणकर, मोहन गिरप, पूर्वेस तोरस्कर, प्रवीण दळवी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg