loader
Breaking News
Breaking News
Foto

सन 2023 आणि 2024 चे कृषी पुरस्कार जाहीर , जिल्ह्यातील डॉ. शैलेश शिंदेदेसाई, अनंत खांबे, पत्रकार मैरुन नाकाडे, धनंजय केतकर, आनंद देसाई, दयानंद चौगुले यांचा समावेश

रत्नागिरी, दि. 23 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने सन 2023 आणि 2024 वर्षाकरिता प्रदान करण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन 2023 करिता जाहीर झालेले पुरस्कार- वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, ठाणे विभागात डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई, मु. पो. ओणी, ता. राजापूर. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)- अनंत बाबाजी खांबे, मु. पो. मांडकी, ता.चिपळूण. सन 2024 करिता जाहीर झालेले पुरस्कार- वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, ठाणे विभागात आनंद जयंत देसाई मु. पो. पावस ता. रत्नागिरी. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, ठाणे विभागात मैरुन हमीद नाकाडे, मु. पो. नेवरे ता. रत्नागिरी. उद्यान पंडित पुरस्कार, ठाणे विभागात धनंजय श्रीकृष्ण केतकर, मु. पो. भिले, ता. चिपळूण. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)- दयानंद बाबाजी चौगुले, मु.पो. खरवते - गावठाणवाडी, ता. राजापूर. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कार्थींची निवड करण्यात आली आहे. कक्षाधिकारी रुचिता पिंपळे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg