सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात मुख्य रस्त्यांवर पाळीव गायी आणि बैलांचे कळप ठाण मांडत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, सावंतवाडी नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच नगरपरिषदेचा कोंडवाडा आता नेमका कुठे आहे? असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरातील प्रमुख मार्गांवर पाळीव जनावरे सर्रास फिरताना पाहायला मिळतात. ही जनावरे अचानक भर रस्त्यात उतरतात किंवा मधोमध उभी राहत असल्याने वाहनधारकांना आपली वाहने जागेवरच थांबवावी लागतात. यामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात गायी आणि बैलांचे रस्त्यावर मोकाटपणे फिरण्याचे प्रमाण नित्याचेच झाले आहे. आज तर थेट तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच जनावरांचा मोठा कळप थबकला होता.
आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर जनावरांनी ठिय्या मांडल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या समस्येमुळे अपघाताची शक्यताही वाढली असून, नगरपरिषदेने तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून कोंडवाडा सुरू करावा, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून केली जात आहे.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.