loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड खाडीपट्ट्यातील कर्जी गावात पाण्याची भीषण टंचाई ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील कर्जी गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने खाडी पट्ट्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की खाडीपट्यातील सर्वात मोठा व महसूल देणारा गाव म्हणून कर्जी गाव ओळखला जातो. मात्र या गावांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत शासन स्तरावर कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे या परिसरातील लोकांनी पाण्याविना जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नळपाणी योजनेची पातळी सुकून गेली आहे. पाण्याच्या ठिकाणी पाणी सुकून जमिनीला तडे गेले आहेत. गेल्या अनेक वर्षामध्ये पहिल्यांदाच या गावाला पाण्याची इतकी भीषण टंचाई जाणवत आहे. त्यामुळे गावकर्‍यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. अनेक ग्रामस्थांवर तीस-तीस किलोमीटर अंतरावरून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

टाईम्स स्पेशल

तसेच अनेक ग्रामस्थ पाऊस पडेपर्यंत गाव सोडून स्थलांतरीत झाले आहेत. याबाबत प्रशासन कोणती दखल घेते व ग्रामस्थाला पाणी मिळते का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. याबाबत कर्जी गावचे सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई तांबे यांनी माहिती देताना सांगितले की, कर्जी येथील जॅकवेल परिसरातील धरण सुकून गेल्याने ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत आहे. लोकांना पायपीट करून उन्हातानातून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg