loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी ब्राह्मणवाडी शाळेचे स्वच्छतागृह धोकादायक; विद्यार्थ्यांना उघड्यावर जाण्याची वेळ

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेचे स्वच्छतागृह पूर्णपणे नादुरुस्त झाले असून ते कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. स्वच्छतागृहाचा वापर करता येत नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागत असून, यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राजवाडी ब्राह्मणवाडी जिल्हा परिषद शाळा ही तालुक्यातील प्रगतशील शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, गेल्या तीन वर्षांपासून शाळेच्या स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतागृहाच्या अभावामुळे काही पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश इतर शाळांमध्ये घेण्यास सुरुवात केल्याचेही सांगितले जात आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बंड्या लिंगायत यांनी कडवई प्रभाग बैठकीत हा विषय उपस्थित केला होता. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी संबंधित अधिकारी वर्गाची कानउघाडणी करत हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले होते.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर शिक्षण विभाग आणि ग्रामसेवक यांनी आवश्यक कार्यवाही सुरू केल्याची माहिती मिळत आहे. शाळेत स्वच्छतागृह नसणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी खंत बंड्या लिंगायत यांनी व्यक्त केली. आता शिक्षण विभाग आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती या गंभीर प्रश्नावर कोणता निर्णय घेते आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुसज्ज स्वच्छतागृहाची सुविधा कधी उपलब्ध करून देते, याकडे ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg