loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड एसटी आगाराला प्राप्त पाच नव्या 'जिजाऊ' बस गाड्यांचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते लोकार्पण

देवगड : देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या 'जिजाऊ' बस गाड्यांचे लोकार्पण आज पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. या बसेस अत्यंत आरामदायी असून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी एसटी बससेवेचा अधिकाधिक वापर करावा,असे आवाहन करून एसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रवाशांना दर्जेदार, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर द्यावा, अशा सूचना नामदार राणे यांनी दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, विभाग नियंत्रक दीपक घोडे, संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सचिव योगेश चांदोसकर, वैभव करंगुटकर, योगेश पाटकर, दया पाटील, सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, नगरसेवक, विषय समिती सभापती, देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर, यंत्र अभियंता, चालक पांडुरंग वाघमोडे, स्थानक प्रमुख डोंगरे, एसटीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg