loader
Breaking News
Breaking News
Foto

चारचाकी आणि दुचाकी अपघातामध्ये 47 वर्षीय युवकाचा मृत्यू

वेळणेश्वर (प्रतिनिधी) - गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागर दिवाणी न्यायालयासमोर चारचाकी व दुचाकी अपघातामध्ये 47 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी 6.45 वाजता घडला अपघात. संजय वसंत कानसरे, वय 47, राहणार गुहागर सांगळेवाडी. असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रसिद्ध पेंटर म्हणून त्याचे नाव होते. काल सायंकाळी 6:45 वाजता मोडकाघर इथून तो गुहागरकडे येत होता याचवेळी गुहागरकडून शृंगारतळीच्या दिशेने जाणाऱ्या इको चार चाकी वाहनाला धडक बसली आणि अपघात झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातामध्ये संजय कानसरे हे जबर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी कामथे येथील रुग्णालयामध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. कामथे रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्यावर सोमवारी सकाळी गुहागर चैतन्य भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, आणि दोन मुले, तसेच दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg