loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील वारंवार खंडित वीजपुरवठ्याबाबत महावितरणला निवेदन

खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील खाडीपट्टा परिसरात गेल्या काही काळापासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या खेड विभागाचे कार्यकारी अभियंता बाबरेकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात खाडीपट्ट्यातील गावांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तीव्र उकाड्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे. तसेच वीजेच्या कमी-जास्त दाबामुळे घरगुती तसेच व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होत असल्याची तक्रारही करण्यात आली. खाडीपट्ट्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि इतर उपकरणांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत व अखंडित ठेवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खाडीपट्ट्यातील सुनील पवार, दीपक भांबड, विनोद बहुतुले, राजेश पालकर, संदेश शिगवण, संतोष बारे, सुभाष नाचरे यांच्यासह खाडीपट्ट्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg