loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (KGPA) या डॉक्टर संघटनेतर्फे जागतिक योग दिन साजरा

खेड - खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (KGPA) या डॉक्टर संघटनेतर्फे जागतिक योग दिन निमित्ताने खेड तालुका जेष्ठ नागरिक संघ यांचे सहकार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे योग प्रत्यक्षिके आयोजित करण्यात आली. योगशिक्षिका वैद्य आणि डॉ मधुरा बाळ यांनी योगाचे महत्व सांगून विविध आसने जसे वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, भुजंगासन व सूर्यनमस्कार क्रमवारीने करवून घेतली. कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते शीतली सित्कारी प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रा. जेष्ठ नागरिकांसाठी विशेष खुर्चीतील सूर्यनमस्कार ही संकल्पना सर्वांनाच भाऊन गेली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष आबा निकम, महिला अध्यक्षा उज्ज्वला पाटणे व कोषाध्यक्ष अप्पा मेहता उपस्थित होते. KGPA डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ परेश मळणगावकर यांनी प्रास्ताविक करताना अष्टांग योगाचे दैनंदिन महत्व विषद केले. कोअर कमिटी चेअरमन डॉ श्याम गिल्डा, सचिव डॉ सिद्धेश चिखले, खजिनदार डॉ राजेश यादव यांच्यासोबतच डॉक्टर सदस्यांनी तसेच जेष्ठ नागरिकांनी यावेळी उत्साहाने सहभाग नोंदवला.

टाईम्स स्पेशल

संपूर्ण कार्यक्रमाच्या उपयुक्ततेविषयी सर्वांनीच भावना व्यक्त केल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रकल्पप्रमुख म्हणून डॉ. मधुरा बाळ यांनी यशस्वी नियोजन केले. योगप्रसार करण्याविषयी शपथग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg