loader
Breaking News
Breaking News
Foto

वडगावबुद्रुक येथे १५ हजार रुपयांची चोरी; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

खेड : खेड तालुक्यातील वडगावबुद्रुक येथे घरातील कपाटातून १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी खेड पोलिस स्थानकात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन अनाजी मोरे (५०) हे सध्या मुंबई येथे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून त्यांचे मूळ गाव वडगाव बुद्रुक, ता. खेड आहे. त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेली १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खेड पोलिसांत तक्रार दाखल केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारीनुसार, गजानन तानाजी तांबे (४२, रा. अंजुवाडी, मालवणी, मालाड, मुंबई) याने ही रक्कम चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजल्यापासून ते २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यतच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी गजानन तांबे याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg