loader
Breaking News
Breaking News
Foto

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये दहावर्षिय बालकावर शस्त्रक्रिया

कोर्लई (राजीव नेवासेकर) - मुरुड तालुक्यातील नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये 10 वर्षीय बालकाच्या हाताच्या फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर बालकाला हाताला गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.प्रतिक गुंडरे व डॉ.हिरालाल आणि त्यांच्या टीमने तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे गावातील कुमार ओम् उमेश कदम या दहा वर्षिय बालकाच्या हातावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली.विशेष बाब म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबाला कोणताही आर्थिक भार सहन करावा लागला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शस्त्रक्रियेनंतर बालकाची प्रकृती स्थिर असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत यासाठी आयुष हॉस्पिटल सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शासकीय आरोग्य योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून, अशा योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा.असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg