loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना युवा सेनेचा आक्रमक पवित्रा; एमएसईबीला इशारा

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला विरोध होत असताना चिपळूण तालुक्यातही या मुद्द्यावर वातावरण तापू लागले आहे. शिवसेना युवा सेना चिपळूण तालुका प्रमुख प्रीतम वंजारे यांनी स्मार्ट मीटरच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत महावितरण (एमएसईबी) प्रशासनाला इशारा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रीतम वंजारे यांनी सांगितले की, सर्वसामान्य ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये. स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे लोकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना युवा सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत, नागरिकांच्या विरोधाला न जुमानता स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यास ते फोडून टाकण्यात येतील, असा इशारा महावितरण प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, स्मार्ट मीटर योजनेबाबत सरकार व महावितरणकडून जनजागृती करण्यात येत असली तरी काही ठिकाणी नागरिक आणि विविध संघटनांकडून विरोध होत असल्याचे चित्र आहे. चिपळूणमध्ये युवा सेनेने घेतलेल्या या भूमिकेकडे आता महावितरण प्रशासन आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg