केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा येथे फणस संशोधन केंद्र होण्यासाठी मागणी केल्यानंतर लांजा फणस संशोधन केंद्राचा सुमारे ४० कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाला कोकण कृषी विद्यापीठाने सादर केलेला असून अद्याप याबाबत बहुचर्चित फणस संशोधन केंद्र रखडले आहे. अद्यापही या केंद्राची जागा कुठे निश्चित करावयाची याची स्थिती नाही. पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा करून मुहूर्त स्वरूप द्यावे, अशी मागणी २०२५ साली लांजातील शेतकर्यांनी केली होती. मात्र वर्ष होऊन गेले तरी याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. फणसाच्या लागवडीखालील तसेच प्रक्रियेस भविष्यात असलेला वाव लक्षात घेऊन लांजा जिल्हा रत्नागिरी येथे फणस संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या संशोधन केंद्राला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ४०कोटीचा प्रस्ताव डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केला असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
देश विदेश पातळीवर फणस जातीचा अभ्यास करणे वाणांचा संग्रह, तुलनात्मक अभ्यास फणसाचे गरे, फणस कुयरीची भाजी तयार, फणस पल्प व त्यापासून उत्पादने ताज्या व उकडलेल्या बिया व त्याची पावडर वर्षभर फणसाचे उत्पादन फणसाच्या स्वतंत्र जाती तयार करणे रोगकिटक शाखीय व्यवस्थापन यासाठी संशोधन करणे. शेतक-यांना रोपवाटिका उत्पादन पध्दती तसेच प्रकीया पदार्थ यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण राबविणे. यासाठी हे संशोधन केंद्र आहे. लांजातील फणस संशोधन केंद्राला राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली असून लांजा कृषी केंद्र जागेतच होणार आहे. लवकरच अंमलबजावणी होणार असल्याची माहिती पालक मंत्री उदय सांमत यांनी लांजा येथे लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांना दिली. तसेच लांजाचा फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव रखडला असल्याने चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. तसेच १५ जुलै २०२५ च्या विधान परिषदेत आमदार सदाभाऊ खोत, आमदार प्रविण दरेकर, तसेच आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनीही लांजाला फणसंशोधन केंद्र झाले पाहीजे, अशी आग्रही भुमिका मांडली होती.
सभासदांच्या तीव्र भावना लक्षात घेता सभापती प्रा.राम शिंदे यांनी तत्कालीन कृषी मंत्री कोकाटे यांच्यासमवेत एक बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही का झाली नाही? केंद्राचा प्रस्ताव का रखडला? हा पश्न अधांतरीच राहीला आहे. यासंदर्भातील वृत्त ही वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली होती. लांजाला फणस संशोधन केंद्र होणार असल्याने शेतकरी वर्गातुन आनंदाचे वातावरण होते. मात्र सदर केंद्राचा प्रश्न का रखडला आहे. लांजालाही कृषी विद्यालय असून जागा ही आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लांजाला असताना केंद्राच्या जागेचा प्रश्न येतो कुठे? असा सवालही उपस्थित होत आहे. लांजा येथे सदर संशोधन केंद्र होणार की नाही? याबद्दल साशंकता निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. पावसाळी अधिवेश सुरू झाले असुन या अधिवेशनात रखडलेल्या केंद्राचा प्रश्न मार्गी लावून लांजा ठिकाणी संशोधन व्हावे, अशी मागणी जनतेतून केली जात आहे. या कामी आमदार किरण सामंत यांनी लक्ष देऊन लांजा ठिकाणीच फणस संशोधन केंद्र झाले पाहीजे, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.

















.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.