रत्नागिरी - योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य परंपरा आहे. योगामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल राखला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. योगाचे हे महत्त्व पटवून देण्यासाठी 21 जून रोजी असलेल्या 'आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त' 'स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी' विभागाने योग दिन साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात योगाचे महत्त्व सांगून करण्यात आली.
विद्यार्थ्यांना ताडासन, वृक्षासन, वज्रासन तसेच विविध सोपी योगासने आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. लहानग्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करत निरोगी जीवनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी देखील अगदी आवडीने सर्व योगासने केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना नियमित योग करण्याची प्रेरणा देण्यात आली. योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.
या योग दिनाच्या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्रायमरी विभागाच्या अपूर्वा मुरकर आणि प्री प्रायमरी विभागाच्या शुभदा पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीसुद्धा या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले.
















.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.