loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या मॉडेल स्कूल ‘फणसू’मध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत; पहिल्याच दिवशी शाळेचा परिसर फुलला आनंदाने

दापोली (​सागर गोवळे) - शिक्षणरत्न संस्था संचलित मॉडेल स्कूल, फणसू येथे आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात आणि भव्य स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करत आणि हातात रंगीत फुगे देऊन त्यांचे जंगी स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा, या उद्देशाने शिक्षकांनी विशेष नियोजन केले होते. सकाळी विद्यार्थी शाळेत पोहोचताच, शिक्षकांनी रांगेत उभे राहून प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते वर्गापर्यंत फुलांची सजावट करण्यात आली होती, तर वर्गखोल्याही आकर्षक पद्धतीने सजवल्या होत्या.

टाईम्स स्पेशल

​शिक्षकांनी घेतलेल्या या विशेष मेहनतीचे पालकांनीही कौतुक केले. 'शाळा हे दुसरे घर' असते, याची प्रचिती विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आल्याने त्यांच्यातील अभ्यासाची गोडी अधिक वाढणार आहे. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg