loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचे आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त दिलीप देवळेकर यांना राज्यस्तरीय कोकण भुषण पुरस्कार ,मुंबई येथे मंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते सन्मान

खेड:[प्रतिनिधी] शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खेडचे आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त श्री.दिलीप स.देवळेकर यांची राज्यस्तरीय "कोकण भुषण" पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोकण दिप च्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त १४ जुन २०२६ रोजी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मुंबई येथे प्रा.सुरेंद्र गावस्कर सभागृह ,मुंबई मराठी संग्रहालय इमारत, दादर येथे मा.ना.योगेशदादा कदम [राज्य मंत्री गृह(शहरे),महसुल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण व औषध प्रशासन विभाग, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीरभाऊ कदम,ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री.दिलीप देवळेकर हे खेडचे सुपुत्र असुन दै.रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार व अधिस्विकृती समिती महाराष्ट्र शासनचे कोकण विभागीय समिती सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन तसेच विविध पदांवर कार्यरत आहेत. एक अभ्यासु व आदर्श पत्रकार म्हणून महाराष्ट्रातील विविध संस्थेने,सरकारने अनेक पुरस्काराने गौरव केला आहे.कोकण दिप २४ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता इत्यादी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात विविध कामगिरी केल्यामुळेच गौरव करण्यात येणार आहे.श्री.दिलीप देवळेकर यांची कोकण भुषण पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg