loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड पोटावर लाकूड पडून जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड - खेड तालुक्यातील फुरुस येथे मजुरीचे काम करत असताना पोटावर लाकूड पडून गंभीर जखमी झालेल्या ५८ वर्षीय मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिनेश गणू बाईत (वय ५८, रा. संगलट, शेरवली, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश बाईत हे मजुरीच्या कामासाठी फुरुस येथे गेले होते. काम सुरू असताना त्यांच्या पोटावर अचानक लाकूड पडल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात (आयसीयू) त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच १२ जून २०२६ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आमृ. क्रमांक ५१/२०२६ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल आहे. संबंधित नोंद २४ जून २०२६ रोजी दुपारी १२.५२ वाजता दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg