देवरुख( प्रतिनिधी) जिल्ह्यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुखचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली देवरुख शहर व परिसरात ड्रिंक अँड ड्राईव्ह, विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत ब्रेथ अनालायझर विना शहरातील प्रमुख मार्गांवर विशेष नाकाबंदी करून वाहनचालकांची कसून तपासणी केली जात आहे. हे नियमानुसार ब्रेथ अनालायझरच्या साहाय्याने मद्यप्राशन केलेल्या चालकांवर कारवाई करण्यात येते. परंतू देवरूख पोलीसांकडील ब्रेथ अनालायझर बंद असल्याने अशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तपासणी केली जाते..
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात रोखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. विशेषतः रात्रीच्या वेळी राज्य मार्ग आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर तपासणीची तीव्रता वाढविण्यात आली आहे. दरम्यान, ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या मोहिमेमुळे अधिकृत बार मधे ग्राहकांची संख्या कमी झालेली दिसून येत असून परमीट धारक बार व्यावसायिकांना फटका बसला आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.