loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी येथे योगदिन उत्साहात संपन्न

रत्नागिरी - जि.प.शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी ता.जि. रत्नागिरी येथे जागतिक योग दिन संपन्न झाला. सुरुवातीस योगाभ्यास ही काळाची गरज आहे, योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. याबाबत मुख्याध्यापक अनुजा केळकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ’मज नको औषधे योग हवा’ हे योगगीत विद्यार्थ्यांनी सादर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर शाळेच्या शेजारील हेमंत आठवले नियोजित नारळाच्या बागेत योग सराव करण्यात आला. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आठवले कुटुंबिय आणि पालक वर्ग उपस्थित होता. योग प्रात्यक्षिकानंतर प्रसाद आठवले कुटुंबियांनी मुलांना खाऊ वाटप केले. या अनोख्या कार्यक्रमात शिक्षक विद्यार्थ्यांनी सुंदर योगासने प्रात्यक्षिके, प्राणायाम केले. उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg