loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रशाळा मसुरे नं. १ मध्ये ईव्हीएम मशीनद्वारे शालेय मंत्रीमंडळ निवडणूक संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेची जाणीव व्हावी आणि मतदानाचे महत्त्व कळावे, या उद्देशाने केंद्रशाळा मसुरे नंबर १ येथे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 'शालेय मंत्रिमंडळ निवडणूक' खऱ्या निवडणुकीच्या धर्तीवर आणि अत्यंत उत्साहात पार पडली. या निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात आले, जे या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. यात मुख्यमंत्री पदी मानवी शिंगरे बहुमताने विजयी झाली. उपमुख्यमंत्री पदी मानसी मुळये हिची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शालेय मुख्यमंत्री पदासाठी मानवी शिंगरे आणि मानसी मुळये या दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आमनेसामने होत्या. प्रत्यक्ष मतदानावेळी विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एका तासात मतमोजणी करण्यात आली. विजयी मुख्यमंत्री मानवी शिंगरे आणि उपमुख्यमंत्री मानसी मुळये यांचे मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर आणि उपस्थित सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी पदवीधर शिक्षक गणेश घुगे, उपशिक्षिका सुजाता वेडेकर, पदवीधर शिक्षक दर्शन हजारे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हेमलता दुखंडे, संस्कृती बांदीवडेकर, नाझिया शेख आदी मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षकांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg