loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील ९७ ग्रा.पं. मध्ये सदस्य आरक्षण प्रक्रिया पूर्ण

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींसाठी सदस्यपदांच्या आरक्षणाची प्रक्रिया १२ जून रोजी झाली. तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी ४८ मंडळाधिकारी व तलाठी यांनी अध्यासी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. ग्रा.पं. मध्ये सदस्यसंख्या गावनिहाय भिन्न असून काही ग्रा.पं. मध्ये ७, काही ठिकाणी ११ तर काही ठिकाणी १५ सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सदस्यसंख्येच्या आधारे सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण निश्चितीची प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार आणि संबंधित लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करण्यात आली. निश्चित करण्यात आलेले आरक्षण अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले असून १९ रोजी आरक्षणाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg