loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

वरवेली (वार्ताहर) - श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर येथे शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साह पूर्ण व नाविण्यपूर्ण रीतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रंगीत फुलांनी नटलेली, नैसर्गिकरीत्या मांडणी, सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी आकर्षक कमान उभारण्यात आली होती. त्यावेळी गुहागर केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील, ९१ वर्षाच्या इतिहासात प्रथमतः लाभलेल्या गुहागर विद्यालयाच्या पहिल्या व विद्यमान मुख्याध्यापिका सुजाता कांबळे पर्यवेक्षिका गायत्री कनगुटकर, गंगावणे, पालक नाटेकर, साळवी, मोहिते, तांबट, गमरे, पावसकर, साबळे, प्रशालेचे सर्व विद्यार्थी व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यालयामध्ये प्रथमतः प्रवेश घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बँड पथकाच्या तालावर वाजत गाजत उस्फूर्तपणे पुष्प वर्षाव करत प्रवेशद्वारापर्यंत आणण्यात आले. त्यावेळी पर्यवेक्षिका गायत्री कनगुटकर व तांबट यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले व सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गमरे यांनी केले. त्यावेळी उपस्थित पालक व मान्यवर यांचे शुभ हस्ते पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. नाविन्यपूर्णरितिने व यशस्वीरित्या शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg