loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी शुभम भोसले सी. ए. उत्तीर्ण

खेड - माहे मेमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सी. ए. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडचा माजी विद्यार्थी शुभम भोसले याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात सी. ए. फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन रोटरी स्कूलच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला. रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी शुभम भोसले याने इयत्ता सन 2020-21 मध्ये 12वी पर्यंतचे शिक्षण रोटरी स्कूलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले. रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याची सी. ए. या अभ्यासक्रमाची तयारी सुरू झाली होती. यासाठी त्याला रोटरी स्कूलमधील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सी. ए. परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता सी. ए. फाउंडेशन व सी. ए. इंटरमिजिएट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी शुभम भोसले याने या दोन्ही परीक्षा आपल्या पहिल्याच प्रयत्नांत उत्तीर्ण करुन सी. ए. परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. शुभम भोसले याचे सी. ए. परीक्षेतील यश हे रोटरी स्कूलसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. शुभम भोसले हयाला विषय शिक्षक प्रा. रुपाली बोडस, प्रा. बाळासाहेब राऊत, प्रा. पारस नलावडे, प्रा. फरहीन काझी, प्रा. संतोष पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शुभम भोसले याचे संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg